Home > News Update > #NCB : नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देतांना फ्लेचर पटेल यांची तारांबळ

#NCB : नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देतांना फ्लेचर पटेल यांची तारांबळ

#NCB : नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देतांना फ्लेचर पटेल यांची तारांबळ
X

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा NCBवर गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर आणखी पुन्हा तोफ डागली आहे. फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. ते समीर वानखेडेंच्या प्रसिद्धीसाठी कार्यक्रम आयोजित करतात, असा आरोप मलिक यांनी केला आहे. "साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत" असेही नवाब मलिक म्हणाले.

"गेल्या वर्षभरातील एनसीबीच्या केसेसची माहिती घेतली. त्यात तीन केसेसची माहिती संदिग्ध वाटली. सीआर नंबर ३८/२० सर्च ऑपरेशन करण्यात आलं. २५ नोव्हेंबर २०२० मध्ये छापा मारला. त्यात फ्लेचर पटेल हे अनोळखी पंच करण्यात आले. त्यानंतर सीआर नंबर १६/२० मध्ये ९ डिसेंबर २०२० रोजी सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यातही फ्लेचर पटेल पंच आहे. तिसरी केस आहे सीआर नंबर २/२१ आहे. त्यानुसार २ जानेवारी २१ ला छापेमारी करण्यात आली. त्यातही फ्लेचर पटेल पंच आहेत. फ्लेचर पटेल इंडिपेंडंट पंच आहेत असं सांगता मग ते तुमचे फॅमिली फ्रेंड कसे? पंचनाम्यासाठी जवळच्या लोकांना घेता. याचा अर्थ ही कारवाई ठरवून केलीय का?" असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

सीआरपीसी कायद्यात एकच पंच ठिकठिकाणी दिसत असेल तर केसेसमध्ये तथ्य नाही असा निष्कर्ष बर्‍याच केसेसमध्ये कोर्टाने काढला आहे, याची आठवणही नवाब मलिक यांनी करुन दिली आहे. तीन केसेसमध्ये एकच व्यक्ती फ्लेचर पटेल पंच कसे झाले यांचं उत्तर समीर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे कुठलं रॅकेट मुंबईत सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करतोय. हे सगळे लोक बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करुन खंडणी उकळण्याचं काम करत आहेत का?, असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

फ्लेचर पटेल यांचे म्हणणे काय?

दरम्यान मलिक यांच्या आरोपांनंतर फ्लेचर पटेल यांनीही पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे सर्व आरोप फेटाळले. नवाब मलिक हे वारंवार NCBवर आणि समीर वानखेडेंसारख्या कर्तव्यनिष्ठ व्यक्तीवर आरोप करत आहेत, पण यामुळेच त्यांचीच प्रतिमा मलिन होत असल्याची टीका त्यांनी केली. ३ केसेसमध्ये आपण पंच कसे, या प्रश्नावर मात्र मलिक यांना ही गुप्त माहिती कशी मिळते, याची चौकशी झाली पाहिजे असे सांगत त्यांनी उत्तर टाळले. तसेच लेडी डॉन म्हणून एका महिलेचा फोटो आपण सोशल मीडियावर का टाकला असा सवालही त्यांनी मलिक यांना विचारला आहे. लेडी डॉन ही आपली बहिण आहे आणि समाजात त्यांचे मानाचे स्थान आहे, असे सांगत पटेल यांनी आपली बाजू मांडली. पण NCBच्या समीर वानखेडे यांच्या कामात एक माजी सैनिक म्हणून मदत करण्याचे आपण आश्वासन दिले होते, त्याप्रमाणे त्यांच्याकडे मनुष्यबळाची कमतरता असले तेव्हा आम्ही मदतीला जातो असेही त्यांनी यावेळी मान्य केले.

Updated : 16 Oct 2021 2:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top