Home > News Update > ५ शिवशाही बसेस जळून खाक, आग लावल्याचा अंदाज

५ शिवशाही बसेस जळून खाक, आग लावल्याचा अंदाज

५ शिवशाही बसेस जळून खाक, आग लावल्याचा अंदाज
X

सातारा बसस्थानकात उभ्या असलेल्या 5 शिवशाही बसेना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने आग तातडीने विझवली पण तोपर्यंत गाड्या जळून खाक झाल्या होत्या. या भीषण आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण यामध्ये एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या शिवशाही बसेसमध्ये काही तरुण सिगारेट ओढत होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक ही आग लावली गेली असा आरोप तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी केला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे..


Updated : 10 Feb 2021 3:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top