Home > News Update > समृद्धी महामार्गावरील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत- मुख्यमंत्री शिंदे

समृद्धी महामार्गावरील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत- मुख्यमंत्री शिंदे

समृद्धी महामार्गावरील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत- मुख्यमंत्री शिंदे
X

समृद्धी महामार्गावरील शहापूर सरलांबे इथे मध्यरात्री भीषण अपघात झाला. क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक घटने विषयी त्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे आणि जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.

त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की आज १ ऑगस्ट पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी जाण्यास सांगितले. एनडीआरएफचे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला आहे असे एकनाथ शिंदेनी ट्विट द्वारे कळवले आहे.Updated : 1 Aug 2023 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top