Home > News Update > आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील पाच जणांना अटक

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील पाच जणांना अटक

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील पाच जणांना अटक
X

बीड// पुणे आरोग्य विभागातील पेपर फुटीप्रकरणी लातूर येथील आरोग्य विभागाचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यासह बीड जिल्ह्यातील पाच जणांना पुणे सायबर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. दरम्यान या पेपर फुटीप्रकरणात बीड रॉकेटचा सहभाग असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता अकरा वर गेली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात असून अटक केलेल्या डॉक्टर, शिक्षक, निवृत्त लष्करी जवान यांचा समावेश आहे याच दरम्यान यामागे बडगिरे हाच सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय असून पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे.

राज्यात 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची परीक्षा झाली होती. या परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोग्य विभागाकडे तक्रारीचा पाऊस पडला होता, अखेर आरोग्य विभागाच्या वतीने त्याची पुणे सायबर पोलिसात तक्रार झाल्यानंतर तपासाला वेग आला. यापूर्वी घोटाळ्यात जालना येथील तीन तसेच औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजेर करण्यात आले. या प्रकरणात आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून सायबर पोलिसांकडून तपास सुरू होता. सोमवारी रात्री मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर बीड जिल्ह्यातील पाच आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

लातूर येथील आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे, डॉ. संदीप त्रिंबक जोगदंड , उद्धव प्रल्हाद नागरगोजे , श्याम महादेव मस्के ,राजेंद्र पांडुरंग सानप अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यापूर्वी विजय मोराडे, अनिल गायकवाड, बबन मुंडे ,सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक करण्यात आली. यापैकी मोराडे, गायकवाड आणि जगताप हे आरोपी जालना जिल्ह्यातील आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस हाके, पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमारे, संदेश कर्णे, नवनाथ जाधव , शिरीष गावडे, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

Updated : 9 Dec 2021 3:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top