Home > News Update > अतिवृष्टीचा पहिला बळी ; यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली आत्महत्या

अतिवृष्टीचा पहिला बळी ; यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली आत्महत्या

अतिवृष्टीचा पहिला बळी ; यवतमाळ जिल्ह्यातील  शेतकऱ्याने केली आत्महत्या
X

यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे महागाव तालुक्यातील तिवरंग येथील शेतकरी नामदेव संभाजी वाघमारे (वय ५२ ) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत शेतकऱ्याच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःच्या नावाने तीन एकर शेती आहे. व त्यांना तीन अपत्य आहेत. त्यांच्यावर खाजगी आणि शासकीय असे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. सततच्या नापिकेने आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.

Updated : 11 Aug 2023 3:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top