Home > News Update > ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन...

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन...

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन...
X

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे (dr vishwas mehendale)यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी मुलुंड येथे आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड पूर्व येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. मेहेंदळे यांनी काही वेळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केले आहे. विश्वास मेहेंदळे यांची ओळख वृत्तनिवेदक, लेखक, अभिनेते अशी होती. त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सुत्रसंचालन केले आहे. तसेच १८ हून अधिक पुस्तकांचे लेखन सुद्धा केले आहे. याव्यतिरिक्त मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणून विश्वास मेहेंदळे यांची ओळख होती. विश्वास मेहेंदळे यांनी सुरवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही वेळेसाठी नोकरी केली होती.

मेहेंदळे यांची ओळख ही ज्येष्ठ माध्यमकर्मी अशी होती. वेधशाळेतील नोकरीनंतर त्यांनी मिडियासंबंधीची कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरवात केली. मेहेंदळे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही होते. त्याचप्रमाणे पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन विभागाचे ते विभागप्रमुख सुद्धा होते. 'सिम्बॉयसिस इन्सिट्यूट ऑफ मीडीया आणि कम्युनिकेशन' चे संस्थापक होते. डॉ. विश्वास मेहेंदळे हे दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक होते.पहिल्या मराठी बातम्या दिल्लीच्या आकाशवाणीवरुन वाचणारे ते निवेदक ठरले होते. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेचं नाही. मुंबई दूरदर्शनचे ते पहिले वृत्तनिवेदक सुद्धा होते.

त्यानंतर त्यांनी मुंबईच्या दूरदर्शनचे संचालक म्हणून सुद्धा काम केले. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीमध्ये त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे काही काळ संचालकपदही सांभाळले होते. 'मला भेटलेली माणसे' हा एकपात्री कार्यक्रम डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी यशस्वी करुन दाखवला होता.

या व्यतिरिक्त अग्निदिव्य, एकच प्याला, एक तमाशा अच्छा खासा, खून पाहावा करुन, जर असं घडलं तर, नांदा सौख्यभरे, पंडित आता तरी शहाणे व्हा, प्रेमा तुझा रंग कसा, अशा अनेक सुप्रसिद्ध नाटकामध्ये डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी कामे केली होती. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे विभागाकडून 'मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाकार' पुरस्काराने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. तसेच सृजन फाउंडेशनने महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यात ऑक्टोबर २०१० साली भरवलेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्षही होते.

Updated : 9 Jan 2023 12:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top