नांदेड जिल्ह्यात निवडणुक आयोगाचा पहिला गुन्हा दाखल.
नांदेड जिल्ह्यात 91 मुखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यात कसूर केल्यामुळे मा. कुलदिप जंगम सहा.जिल्हाधिकारी देगलूर तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 16 नांदेड लोकसभा मतदारसंघ यांनी केला क्षेत्रीय अधिकारी यांच्याविरुध्द पहिला गुन्हा दाखल झाला.
X
Nanded : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 91 मुखेड विधानसभा मतदारसंघातील झोन क्रमांक 25 निवळी करीता एल.जे. जाधव उपविभागीय अभियंता लेंडी प्रकल्प उपविभाग क्र.02 इटग्याळ प.दे यांची मा.जिल्हाधिकारी नांदेड़ यांच्या दि.02/02/2024 च्या आदेशान्वये क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची दि.20/02/2024 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती परंतु संबंधित अधिकारी सदर कार्यशाळेत अनुपस्थित राहील्यामुळे संबंधितांना दि.05/02/2024 रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती परंतु संबंधिताने खुलासा सादर केलेला नाही
त्यानंतर 91 मुखेड विधानसभा मतदारसंघात 2 आढावा बैठक घेण्यात आल्या परंतु संबधीत अधिकारी आढावा बैठकीस अनुपस्थित होते क्षेत्रीय अधिकारी झोन क्र 25 चे कामकाज सुरू करणे बाबत दूरध्वनीद्वारे संपर्क केले असता माझी नियुक्ती 89 नायगाव येथे क्षेत्रिय अधिकारी म्हणून झाल्याचे सांगण्यात आले. परंतु संबंधित अधिकारी यांची मूळ पदस्थापना मुखेड तालुक्यातील असल्यामुळे 89 नायगाव मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे संबधित अधिकारी यांना कार्यमुक्त करणे बाबत कळविण्यात आले होते त्यानुसार 89 नायगाव मतदारसंघाचे सहा.निवडणुक निर्णय अधिकारी यांनी यांच्या ऐवजी इतर अधिकाऱ्यांची क्षेत्रिय अधिकारी म्हणून नियुक्ती केले आहेत.
तरी देखील संबंधित अधिकारी 91 मुखेड विधानसभा मतदारसंघात रुजू झालेली नाहीत त्यांच्या अनुपस्थितीमुळे झोन क्रमांक 25 चे मतदान केंद्र तपासणी अहवाल व VM ii व VM iii अहवाल अद्याप वरिष्ठाकडे सादर करता आले नसल्याने निवडणूक कामात व्यतय निर्माण झाला आहे संबंधितास दि.20.02.2024 अन्वये अंतिम कारणे नोटीस देऊन देखील खुलासा सादर न केल्यामुळे संबंधिताविरुद्ध आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला पोलीस स्टेशन मुखेड येथे निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याबाबत निवडणुक नायब तहसिलदार अशोक लबडे यांना प्राधिकृत करून संबंधिता विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आलेला आहे.






