Atal setu accident : अटल सेतूवर पहिला अपघात, डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद
X
Atal setu first accident : रविवारी अटल सेतूवर पहिला अपघात घडला आहे. हा अपघात गाडीच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाला आहे. १२ जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील शिवडी ते न्हावा शेवा (Mumbai Trans Harbour Link ) सागरी सेतूचे लोकार्पण करून जनतेसाठी हा पूल खूला करण्यात आला होता. देशातील सर्वात लांबीचा व सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून या पूलाची नोंद झाली आहे. उद्घाटनानंतर काही दिवसांनी या मार्गावर अपघात झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास एका कारचा अपघात झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरलं होतं आहे. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याचं समजतेय.
भरधाव वेगाने ही कार चालत असल्याचं दिसतेय मार्गावरील दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून पाच जण या कारमधून प्रवास करत होते. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. रविवार असल्याने सागरी सेतूवर वाहनांची वर्दळ अधिक होती. त्या अपघातग्रस्त वाहनाचा चालक रॅश ड्रायव्हिंग करत असल्याचे समोर आले आहे. पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचं दिसत आहे.