पंंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आग

Courtesy : Social Media

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या निवासस्थानाजवळ आग लागल्याची बातमी समोर आलीय. नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ एलकेएम कॉम्प्लेक्सच्या एसपीजी रिसेप्शन भागात सध्याकाळी आग लागली.

पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ट्वीट करुन सांगितले की, “पंतप्रधान यांच्या कार्यालयाला ही आग लागली नसून, जवळील एलकेएम कॉम्प्लेक्सच्या एसपीजी रिसेप्शन भागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली”. आग लागल्याचे कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग किरकोळ असल्यामुळे आगीवर योग्य वेळी नियंत्रण आणले.