Home > News Update > मुंबईत कोवीड हॉस्पिटलच्या आगीत 2 रुग्णांचा मृत्यू, 5 बेपत्ता

मुंबईत कोवीड हॉस्पिटलच्या आगीत 2 रुग्णांचा मृत्यू, 5 बेपत्ता

मुंबईत  कोवीड हॉस्पिटलच्या आगीत 2 रुग्णांचा मृत्यू, 5 बेपत्ता
X

भंडारा येथील हॉस्पिटलच्या आगीची घटना ताजी असताना मुंबईतही एका हॉस्पिटलला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. भांडुपमधील ड्रीम्स मॉलला गुरूवारी रात्री आग लागली. ही आग याच मॉलमध्ये असलेल्या सनराइज हॉस्पिटलपर्यंत पोहोचली. या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69 रुग्णांची सुटका करण्यात आली आहे पण इतर पाच रुग्णांचा शोध सध्या अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.

ड्रीम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर ही आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. तिसर्याू मजल्यावर असलेल्या सनराइज हॉस्पिटलला देखील आगीने आपल्या विळख्यात घेतले. हे कोवीड हॉस्पिटल आहे. आगीची जाणीव होताच या हॉस्पिटलमधील रुग्णांनी प्रसंगावधान राखून इमारतीच्या छतावर आसरा घेतला. अखेर या सर्व रुग्णांना ग्लायडरच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. ड्रीम्स मॉलमध्ये अनेक गाळे हे बंद अवस्थेत आहेत तसेच अनेक कार्यालयं मात्र सुरु आहेत. पण आग विझवताना मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणाही सुस्थितीत नसल्यामुळे अनेक अडचणींना अग्निशमन दलाच्या जवानांना सामोर जावे लागले आहे.

*मॉलमध्ये नियमबाह्य पद्धतीने हॉस्पिटल?*

ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमध्ये सनराइज हॉस्पिटलमधील 2 निष्पाप रुग्णांचे बळी गेले आहेत. परंतु आता या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय. या मॉलमध्ये नियमबाह्य पद्धतीने हे हॉस्पिटल सुरू असल्याची तक्रार याआधी इथल्या स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली होती. परंतु त्यावर कुठलीही कारवाई प्रशासनाकडून केली गेली नाही. अखेर या मॉलमध्ये लागलेल्या आगीत निष्पापांचे बळी गेले, त्याला जबाबदार कोण असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली आहे.

Updated : 26 March 2021 2:37 AM GMT
Next Story
Share it
Top