अखेर महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर..!
X
लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात एकुण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. देशात १९ एप्रिल ते १ जून असं ७ टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात २६ एप्रिल ते २५ में पर्यंत ५ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या संपूर्ण लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल ४ जून रोजी घोषीत करण्यात येईल. असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. आहे.
या लोकसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा नवी दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय निवडणूकीच आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार(Rajeev Kumar), सुखबीर संधू (Sukhbir Singh Sandhu), आणि ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी केली.
2024 हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केलं.
देशात ७ टप्प्यात मतदान होणार : १९ एप्रिल ते १ जून
1. पहिला टप्पा १९ एप्रिल
2. दुसरा टप्पा २६ एप्रिल
3. तिसरा टप्पा ७ मे
4. चौथा टप्पा १३ मे
5. पाचवा टप्पा २० मे
6. सहावा टप्पा २५ मे
7. सातवा टप्पा १ जून
निकाल ४ जूनला जाहीर होईल.
महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार :
1.पहिला टप्पा - (19 एप्रिला मतदान) : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
2.दुसरा टप्पा - (26 एप्रिल मतदान) : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8)
3.तिसरा टप्पा - (7 मे मतदान) : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )
4.चौथा टप्पा - (13 मे मतदान) : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ - 11 )
5.पाचवा टप्पा - (20 मे मतदान) : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 )
काय म्हणाले निवडणूक आयुक्त राजीव कुमार?
लोकसभा निवडणूकीसाठी आम्ही तयार असून १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपतोय. देशात एकुण ९७ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. ज्यामध्ये ४९.७ कोटी मतदार हे पुरुष तर ४७.१ कोटी महिला असणार आहेत. त्याचबरोबर १.८२ कोटी नविन मतदान नोंदणी झालेले आहेत असं राजीव कुमार म्हणाले.
निवडणूक आयोगाकडून आवाहन
मसल पावर मनी पावर रोखण्याचा आव्हान
मसल पावर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सोबत काम करणार
हिंसामुक्त निवडणुका राबवणं आमची जबाबदारी
दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणार
पैशाचा गैरवापर निवडणुकीदरम्यान होऊ देणार नाही
दारू साड्या पैसे वस्तू वाटणाऱ्यांवर कारवाई करणार
निवडणुकीत विमान हेलिकॉप्टर मधून येणाऱ्या वस्तूंची तपासणी होणार
सोशल मीडिया द्वारे अफवा पसरवणाऱ्या वर कारवाई
खोट्या बातम्यांच्या सत्यतेबाबतची खरी माहिती आम्ही देणार
राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांना आमच्या नियमांची माहिती द्यावी
प्रचारात कुणावर वैयक्तिक टीका करू नये
द्वेष निर्माण होईल असं वक्तव्य प्रचारात करू नये
सत्यता पडताळण्यासाठी लवकरच वेबसाईट सुरू करणार
लहान मुलांचा प्रचारात वापर करू नये.