शिवसेना भाजप युती झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’ला दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये युती (Shivsena BJP Alliance) होणार की नाही याबाबत चर्चा रंगल्या होत्या. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. मात्र, युतीचा यंदाचा फॉर्म्युला जरासा वेगळा असणारंय. भाजप १४४ शिवसेना १२६ आणि मित्रपक्ष १८ असा युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटून घेणार आहेत.
- २९ सप्टेंबर ला होणार युती? असा असेल शिवसेना-भाजपचा नवा फार्म्युला
- मुख्यमंत्री आमचाच! शिवसेना-भाजपात टक्कर
- शिवसेना-भाजपमध्ये राडा
शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्यूल्यावर ठाम होती. मात्र, हा ५०-५० चा फॉर्म्यूला जागांबाबत नाही तर मुख्यमंत्रीपदाबाबत होता असं समोर येतंय. यामध्ये काही जागांबाबत अजुनही बोलणी सुरू आहे. त्यात बेलापूरच्या जागेचा समावेश आहे शिवसेनेला बेलापुरची जागा हवी आहे. त्यामुळे घोषणा होण्यास विलंब होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) उद्या किंवा परवा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करू शकतात.
भाजप शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार झाल्यानं शिवसेना १२६ जागांवर युतीसाठी तयार झाल्याचं बोललं जातंय. काल सेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असल्याचं विधान केलं होतं. याचा संदर्भ युतीच्या नव्या फॉर्म्युलाशी जोडला जातोय. नवी मुंबईतील बेलापूर आणि आणखी एका जागेवरून युतीचं घोडं अडलं आहे.
Updated : 29 Sep 2019 11:10 AM GMT
Next Story