Home > News Update > महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरोधातील याचिकेवर अंतिम सुनावणी

महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरोधातील याचिकेवर अंतिम सुनावणी

महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरोधातील याचिकेवर अंतिम सुनावणी
X



महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या प्रकरणात आज अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केले होते. तर याप्रकरणी त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खटला दाखल करण्यात आला होता. पुढे इंदुरीकर महाराजांच्या वतीने संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. हे अपील न्यायालयाने मंजूर करत, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील खटला रद्द केला होता.

त्यामुळे निकालाला आव्हान देत याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी ऍडव्होकेट जितेंद्र पाटील व नेहा कांबळे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली होती. इंदुरीकर यांच्या विरोधातील तक्रार रद्द करू नये अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

त्यानंतर याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात गेली काही दिवस सुनावणी सुरू होती. मात्र आता इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज अडीच वाजता अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 22 Nov 2021 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top