Home > News Update > शासकीय नोकरीतील दिव्यांगांच्या जागा भरा, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची मागणी

शासकीय नोकरीतील दिव्यांगांच्या जागा भरा, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची मागणी

शासकीय नोकरीतील दिव्यांगांच्या जागा भरा, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची मागणी
X

जागतिक पांढरी काठी दिन १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगात साजरा केला जातो. अंध व्यक्तींच्या आयुष्यात पांढरी काठी चे महत्व अनन्यसाधारण आहे. याच पांढरी काठी दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथे दिव्यांग संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला असंख्य दिव्यांग व्यक्तींनी उदंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी ३५० दिव्यांग व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवू पाहात आहेत. तसेच दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजनादेखील अस्तित्वात आहेत. मात्र अनेक योजना फक्त कागदावर असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे या घटकांसाठी असलेल्या सरकारी नोकऱ्यांमधील राखीव जागा भरल्या जात नसल्याचं धक्कादायक वास्तव आता पुढे आलं आहे. शासनाने सरकारी नोकरी मध्ये असलेल्या दिव्यांगांसाठी च्या राखीव जागा भरून काढाव्यात व आम्हाला रोजगाराचा मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ विभागीय शाखा पुणे यांच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
Updated : 17 Oct 2021 1:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top