Home > News Update > दिवाळीनिमित्त नेत्यांनी वृद्धाश्रमात दिली अनोखी भेट

दिवाळीनिमित्त नेत्यांनी वृद्धाश्रमात दिली अनोखी भेट

दिवाळीनिमित्त नेत्यांनी वृद्धाश्रमात दिली अनोखी भेट
X

हल्ली सणासुदीला किंवा वाढदिवसाला अनाथआश्रम, वृद्धाश्रमांना भेट देऊन त्यांना भेटवस्तु देऊन आपला आनंद साजरा करण्याचा नवीन ट्रेन्ड सुरु झालाय. ही कल्पना जरी छान असली तरी हल्ली यातुन मदतीच्या नावाखाली फोटोसेशन करण्याचा प्रकार जास्तच वाढलाय. नेतेमंडळींचा तर यामध्ये कोणीही हात धरु शकत नाही.

बडनेरामधील मधुबन वृद्धाश्रमात दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आलेल्या नेत्यांनी इथल्या वृद्धांना एक अनोखीच भेट दिली आहे. मात्र ही दिवाळी भेट त्यांना नक्कीच नकोशी झाली असणार यात काही शंका नाही.

दिवाळी निमित्त वृद्धाश्रमातील कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश बुब (Dinesh Bub) आणि बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) समोरासमोर आले. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने पुढे त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. मात्र, घडल्या प्रकाराचा इथल्या वृद्धांनाच अधिक मनस्ताप झाल्याचं दिसतय. या मारहाणीत कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमातील वस्तुची तोडफोड केली आहे.

दोन्हीही नेत्यांसकट त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी जुंपली. आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांना दिनेश बूब यांनी शिवीगाळ केल्याचा आरोपावरुन ही घटना घडली. मात्र दोघांनीही याबाबत पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. पाहा व्हिडीओ...

Updated : 27 Oct 2019 3:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top