Home > News Update > ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आढळले स्त्री जातीचे अर्भक

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आढळले स्त्री जातीचे अर्भक

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आढळले स्त्री जातीचे अर्भक
X

जळगाव जामोद शहरातील सूनगाव मार्गावर एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये स्त्री जातीचं अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी काही महिला शेतात मजुरीसाठी जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून बाळाचा रडण्याचा आवाज आला.

त्यामुळे त्यांनी ट्रॉलीत बघितलं पाहिलं असता एक स्त्री जातीच अर्भक दिसून आलं. या महिलांनी ही बाब तात्काळ परिसरातील नागरिकांच्या लक्षात आणून देताच स्थानिक नागरिकांनी जळगाव जामोद पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी या बाळाला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं असून बाळाची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, हे बाळ कुणाचं आहे? कुणी बेवारस सोडलं याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Updated : 28 Aug 2021 7:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top