Home > News Update > आजाराच्या खर्चाला कंटाळून बापाने मुलाला पंचगंगा नदीत फेकले

आजाराच्या खर्चाला कंटाळून बापाने मुलाला पंचगंगा नदीत फेकले

आजाराच्या खर्चाला कंटाळून बापाने मुलाला पंचगंगा नदीत फेकले
X

जन्मदात्याने पाच वर्षाच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाला कंटाळून मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला. बापाचे नाव सिकंदर हुसेन मुल्ला (रा.कबनुर ) असे समजते. याबाबतची नोंद गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. या पाच वर्षाच्या मुलाचा पोलीस शोध घेत आहे. लहान मुलांना क्रूरपणे हत्या केल्याची जिल्ह्यातील ही चौथी घटना असून हातकणंगले तालुक्यातील तिसरी घटना असल्याने नागरिक हादरून गेले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिकंदर मुल्ला हे गेल्या काही वर्षापासून कबनूर येथे राहतात. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे लहानपणापासूनच त्याला आजाराने ग्रासले होते. मुल्ला कुटुंबीय सिकंदर हे सततच्या खर्चाने त्रस्त झाले होते.या खर्चाला कंटाळून सिकंदर मुल्ला यांनी दोन महिन्यांपूर्वी घर सोडून पलायन केले. त्यांच्या पत्नी आणि मेव्हण्याने त्यांचा शोध घेतला. त्यावेळी मुलाला सोडून न जाण्याचा दम दिला. मुलाच्या आजारामुळे मुंबईला होणाऱ्या वारंवार फेर्‍या आणि खर्च यामुळे कंटाळलेल्या सिकंदर मुल्ला यांनी गुरूवारी रात्री सायकलवरून पंचगंगा नदीत मोठ्या पुलावरून पाच वर्षाच्या मुलाला थेट फेकून दिले. त्यानंतर स्वतः घरी येऊन नातेवाईकांना मुलाला फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यावर कोणाचा विश्वास बसला नाही.

मुलगा बेपत्ता असल्याने तो बेपत्ता असल्याची खात्री पटल्याने नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर सिकंदर मुल्ला यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी पंचगंगा नदीत पाच वर्षाच्या मुलाचा शोध सुरू केला आहे. इचलकरंजी नगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून यांत्रिक बोटीच्या साहाय्याने पंचगंगा नदीमध्ये मुलाला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये नगरपालिकेचे संजय कांबळे यांची टीम व शिवाजीनगर पोलीस कुरुंदवाड शिरोळ सर्वांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पाहणी केली. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात अशा प्रकारची ही चौथी घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

Updated : 1 Oct 2021 12:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top