Home > News Update > सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात ; बस थेट 400 फूट दरीत कोसळली

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात ; बस थेट 400 फूट दरीत कोसळली

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात ; बस थेट 400 फूट दरीत कोसळली
X

नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसचा मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या घटनेत एक महिला जखमी असल्याचे समजते आहे.

Updated : 12 July 2023 3:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top