Home > News Update > 22 जुलैपासून पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत संसदेबाहेर आंदोलन

22 जुलैपासून पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत संसदेबाहेर आंदोलन

केंद्राच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन तीव्र करण्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी नुकतीच होती. आता संयुक्त किसान मोर्चाने देखील याबाबत घोषणा करत 22 जुलैपासून पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत 200 आंदोलक दररोज संसदेबाहेर निषेध करतील अशी घोषणा केली आहे

22 जुलैपासून पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत संसदेबाहेर आंदोलन
X

नवी दिल्ली- केंद्राच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन तीव्र करण्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी नुकतीच होती. आता संयुक्त किसान मोर्चाने देखील याबाबत घोषणा करत 22 जुलैपासून पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत 200 आंदोलक दररोज संसदेबाहेर निषेध करतील असे म्हटले आहे. यामध्ये प्रत्येक शेतकरी संघटनेतील पाच सदस्यांचा समावेश असेल.

संयुक्त किसान मोर्चाने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून 17 जुलैपासून सर्व विरोधी पक्षांना इशारा पत्रही पाठविण्यात येईल.ज्यात केंद्राच्या नवीन कृषी कायद्याला विरोध करण्याचे आवाहन विरोधकांना देखील करण्यात आले आहे. सोबतच हे कृषी कायदे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाही अशा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान पंजाबच्या शेतकरी संघटनांनी राज्यात वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या 'मोती महल' या निवासस्थानी घेराव घालण्याचा इशारा दिला होता मात्र राज्यात वीजपुरवठा सुरळीत झाल्याने हे आंदोलन स्थगित केले आहे.

कृषी कायद्यांना विरोधाबरोबर शेतकऱ्यांनी इंधन तसेच गॅस सिलेंडरच्या विरोधात देखील 8 जुलै ला सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत देशव्यापी निषेध आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सरकार चर्चेसाठी तयार

दरम्यान केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि पीयूष गोयल हे शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेच्या 11 फेऱ्यांचा सहभागी झाले होते. त्यांनी असे म्हंटले आहे की, सरकार चर्चेसाठी तयार आहे, जर शेतकरी त्यांच्याशी संबंधित असलेल्या तरतुदींवर चर्चा करण्यास तयार असतील तर. मात्र सरकार तीनही कृषी कायदे रद्द करणार नाही.असे याआधीच सरकार ने सष्ट केले आहे.

लोकशाही विरोधात लागू केलेला कायदा

संयुक किसान मोर्चाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांवर हे कायदे लादण्यासाठी लोकशाहीला पायदळी तुडवले आहे हे संतापजनक आहे. हे कायदे रद्द करावे या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दुसरीकडे, सरकारने हे कायदे रद्द केले जाऊ शकत नाहीत, असे एकही कारण अद्याप दिले नाही. आम्ही फक्त असा निष्कर्ष काढू शकतो की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधील एक निवडलेले सरकार आपल्या नागरिकांच्या सर्वात मोठा भाग असलेल्या शेतकरी आणि अन्नदात्यांपेक्षा भांडवलदारांचे हित जोपासण्यास प्राधान्य देत आहे असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.

पीलीभीत येथून मोठा ट्रॅक्टर रॅली योजना

यूपीमधील पीलीभीत येथून एक मोठी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे नियोजन किसान मोर्चाने केले आहे. दरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. जींद येथून ग्रामस्थांकडून प्रचंड प्रमाणात गहू पाठवण्यात आला आहे. या आंदोलनात केवळ शेतकरीच सहभागी होत नाहीत तर कामगार संघटना, विद्यार्थी, वकील आणि इतर कार्यकर्तेही सहभागी होत आहेत. दरम्यान संध्याकाळी पंजाबच्या विविध शहरांमध्ये युवकांकडून एकता निषेध आंदोलन नियमितपणे सुरू आहे.

मिल्खा सिंग यांच्या स्मरणार्थ मॅरेथॉन आयोजित

गाझीपूरच्या सीमेवरील बुलंदशहर जिल्ह्यातील मदनपूर खेड्यातील 101 वर्षीय शेतकरी स्वर्ण सिंग हे सुमारे सात महिन्यांपासून शेतकरी चळवळीचा एक भाग आहे. स्वर्णसिंग म्हणाले की, भारतातील येणाऱ्या पिढ्यांसाठी, शेतीच्या रक्षणासाठी आम्ही येत आहोत. त्याचबरोबर मिल्खा सिंग यांच्या स्मरणार्थ शेतकऱ्यांनी गाझीपूर सीमेवर किसान मजदूर मॅरेथॉनचे आयोजनही केले आहे.

एकूणच काय तर यंदाचे पावसाळी अधिवेशन हे केंद्राच्या कृषी कायद्यावरून चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Updated : 5 July 2021 3:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top