Home > News Update > हिंगोलीतील शेतकऱ्यांनी चक्क रक्त काढलंय विक्रीला.! सरकारकडून आर्थिक सहाय्याअभावी व्यक्त केला जातोय संताप

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी चक्क रक्त काढलंय विक्रीला.! सरकारकडून आर्थिक सहाय्याअभावी व्यक्त केला जातोय संताप

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी चक्क रक्त काढलंय विक्रीला.! सरकारकडून आर्थिक सहाय्याअभावी व्यक्त केला जातोय संताप
X

हिंगोली: मराठवाड्यामध्ये यावर्षी कोरडा दुष्काळ पडला असून या दुष्काळामुळे खरिपाच्या हंगामानंतर आता रब्बी हंगामात सुध्दा शेतकरी हवालदिल होताना दिसुन येत आहे. अगोदर सोयाबीन, तूर आणि आता हरभरा हळद ही पीकं पाणी नसल्याकारणाने सुकून गेली. एका बाजूला निसर्गाने बळीराजाला दुष्काळाच्या संकटात टाकलं असताना दुसरीकडे केंद्र व राज्य शासनाकडून सुध्दा शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळालं नाही आणि यामुळे मेटाकुटीला आलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क स्वतःच्या अंगातील रक्तच विक्रीसाठी काढलं आहे.

आमचं रक्त खरेदी करून त्याबदल्यात आम्हाला दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ द्या. अशी काळीज पिळवटून टाकणारी हाक हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तपोवन गावच्या शेतकऱ्यांनी शरीरातील रक्त विक्रीला काढताना इथल्या सरकारला दिली. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आपल्या शेतात पेरणी केलेली लाखमोलाची हळद जुलै - ऑगस्टमध्ये टवटवीत दिसत होती. पण अचानक आलेल्या आलनिनो वादळामूळे राज्यातल्या पावसाचं

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन शेतकरी राजा संकटात सापडला असून अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असाताना सरकारच्या या आडमूठी धोरणामूळे शेकऱ्यांना आर्थिक मदत तर मिळालीत नाही उलट त्यांनी काढलेला पीक विमा सुध्दा विमा कंपनीने आणि केंद्र सरकारने नाकारल्याने शेतकऱ्यांच्या मदतीची दरवाजे बंद झाली.

दुष्काळाचे दुष्टचक्र आणि प्रशासन व लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या शरीरातील रक्त विक्रीला काढले आहेत. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तपोवन गावातील शेतकऱ्यांनी मनात धडकी भरवणारा हा कठोर निर्णय घेतला आहे. सत्येच्या सारीपाटावर बसलेले राज्यकर्ते हिंगोलीच्या या बळीराजाची अवस्था पाहून मदत जाहीर करणार का? आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या फिर्यातून बाहेर कधी काढणार हेच पहावे लागणार आहे.

Updated : 29 Jan 2024 8:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top