Home > News Update > बोदवड तालुक्यात बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

बोदवड तालुक्यात बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्रामध्ये सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

बोदवड तालुक्यात बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत
X

जळगाव : महाराष्ट्रामध्ये सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. जळगाव जिल्ह्यात सध्या काही भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी बोदवड तालुक्यात अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने बळीराजा आकाशाकडे डोळा लावून बसला आहे.

...अन्यथा उगवलेली पिकं करपण्याची शक्यता

बोदवड येथे थोड्याप्रमाणात झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी पेरणी उरकल्या.त्यानंतर आठवड्याभरात झालेल्या रिमझिमीवर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना खतेही दिली. मात्र , त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.येत्या दोन- तीन दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर उगवलेली पिकेही करपून जाण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतातुर आहे.

Updated : 24 July 2021 9:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top