Home > News Update > 'एमएसआरडीसी'च्या रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध कायम!

'एमएसआरडीसी'च्या रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध कायम!

‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचे काम अनेक ठिकाणी बंद पाडल्याचे पाहायला मिळत आहे.

एमएसआरडीसीच्या रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध कायम!
X

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये कोरोना काळातही परिसरातील विविध विकास कामे सुरू आहेत. मात्र, जरी ही कामे सुरू असली तरी 'एमएसआरडीसी'च्या रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

रिंग रूट प्रकल्प हा असा प्रकल्प आहे, ज्यामुळे शहराचा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न सुटणार आहे. मात्र अटाळी आणि वडवली गावातून हा प्रकल्प जाणार असल्याने या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी एक समिती गठीत करून बाधितांच्या घरच्यांना नोकरी आणि जागेच्या बदल्यात मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे. सोबतच प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी रिंग रूट प्रकल्पाचे काम काही ठिकाणी बंद पाडले आहे.

दरम्यान याबाबत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मधस्ती करत प्रकल्प आयुक्तांबरोबर एक बैठक घेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी केलेल्या काही मागण्या आयुक्तांनी मान्य केल्या मात्र, काही मागण्यांसाठी आयुक्तांकडे अधिकार नसल्याने या विषयावर पालकमंत्री निर्णय घेतील असं आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे आमदारांनी अंतिम बैठक आता पालकमंत्र्यांकडे ठेवली असल्याचे नागरिकांना सांगितले आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच रिंग रूट प्रकल्पला सुरुवात होणार असून ही बैठक कधी होणार आणि या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Updated : 8 Aug 2021 11:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top