Home > News Update > धनगर समाजाच्या वतीने बैल पोळा निमित्त शेतकरी आणि बैलांचा सन्मान

धनगर समाजाच्या वतीने बैल पोळा निमित्त शेतकरी आणि बैलांचा सन्मान

धनगर समाजाच्या वतीने बैल पोळा निमित्त शेतकरी आणि बैलांचा सन्मान
X

जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील धनगर समाजाच्या वतीने आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तिथीनुसार पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी बैल आणि शेतकरी यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.

वरणगाव शहरातील भोईवाडा येथे धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची तिथीनुसार पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे हे होते. यावेळी बैल पोळा सणानिमित्त बैलजोडीचा सन्मान धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला तसेच उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील सन्मान धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला.

वर्षभर शेतात राबराबणाऱ्या शेतकरी आणि बैलांमुळे आपल्याला पोटभर अन्न मिळत त्यांच्या या ऋणाची कधीही परतफेफ होऊ शकत नाही मात्र वर्षातून एकदा पोळा सणानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान केला जातो त्या अनुषंगाने आज बळीराजा आणि त्यांच्या बैलाचा सन्मान केल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी म्हटले आहे.

Updated : 6 Sep 2021 10:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top