Home > News Update > भारत बंद शांततेत पाळण्याचे आवाहन, व्यासपीठावर राजकारण्यांना नो एन्ट्री

भारत बंद शांततेत पाळण्याचे आवाहन, व्यासपीठावर राजकारण्यांना नो एन्ट्री

८ डिसेंबरचा भारत बंद शेतकरी संघटनांनी पुकारला आहे. या बंदचे स्वरुप कसे असेल याची घोषणा त्यांनी केली आहे.

भारत बंद शांततेत पाळण्याचे आवाहन, व्यासपीठावर राजकारण्यांना नो एन्ट्री
X

नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंमदोलनाचा सोमवारी बारावा दिवस होता. 8 डिसेंबरला म्हणजेजच मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि संघटना सहभागी होणार असल्याने हा बंद यशस्वी होईल असा दावा आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेला आहे.

दिल्ली-हरयाणा सीमेवरील सिंघू सीमेवर शेतकरी प्रतिनिधींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा बंद दिवसभर असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. पण चक्काजाम मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत असेल आणि हा बंद शांततेत पाळला जावा असे आवाहनदेखील त्यांनी केलेले आहे. या बंद दरम्यान आंदोलकांच्या व्यासपीठावर राजकारण्यांना प्रवेश नसेल असे देखील या पत्रकार परिषदेमध्ये या प्रतिनिधींनी स्पष्ट केलेले आहे.

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरातील सुमारे 15 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल कम्युनिस्ट पार्टी डीएमके यासारख्या पक्षांचा समावेश आहे.

Updated : 2020-12-08T10:37:27+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top