Home > News Update > 'ऐतिहासिक महापंचायत केंद्र सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल'- राकेश टिकैत

'ऐतिहासिक महापंचायत केंद्र सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल'- राकेश टिकैत

ऐतिहासिक महापंचायत केंद्र सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल- राकेश टिकैत
X

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या मागील महिन्यांपासून शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एक ट्विट करत शेतकऱ्यांना संदेश व केंद्र सरकारला सूचक इशारा दिला आहे. "ही महापंचायत ऐतिहासिक असेल आणि शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल" असं ट्विट टिकैत यांनी केलं आहे.

सोबतच "संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने 22 नोव्हेंबर लखनऊमध्ये किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महापंचायत ऐतिहासिक असेल , महापंचायतीनंतर आता पूर्वांचलमध्ये देखील शेतकरी आंदोलन आणखी गतीमान होईल" असं ट्विट टिकैत यांनी केलं आहे. यासोबतच त्यांनी 22NovemberLucknowKisanMahapanchayat हा हॅशटॅग देखील वापरलाय.

"शेतकरी आंदोलनात जवळपास 750 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून त्यांच्या मृत्यूवर साधा शोकही व्यक्त करण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांचे पंतप्रधान नाहीत, असं शेतकऱ्यांना वाटू लागलंय." असं टिकैत यांनी म्हटलं आहे. सोबतच शेतकरी आंदोलन सोडून कुठेही जाणार नाही. जर एखादे सरकार जर पाच वर्षे चालत असेल, तर जोपर्यंत भारत सरकार एमएसपी सुनिश्चित करणारा कायदा करत नाही आणि शेतीचे तीन कायदे रद्द करत नाही तोपर्यंत लोकांचा पाठिंबा असलेले हे आंदोलन सुरूच राहील असं त्यांनी म्हटले आहे.

Updated : 10 Nov 2021 4:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top