Home > News Update > डाळिंब, द्राक्ष पिकाचा हंगाम धोक्यात: प्रा. लक्ष्मण हाके

डाळिंब, द्राक्ष पिकाचा हंगाम धोक्यात: प्रा. लक्ष्मण हाके

डाळिंब, द्राक्ष पिकाचा हंगाम धोक्यात: प्रा. लक्ष्मण हाके
X

परतीच्या पावसाने सांगोला तालुक्यातील डाळिंब आणि इतर फळ पिकांना मोठा झटका बसला असून शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी कडू झाली आहे. वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे फळबागा सांभाळायच्या, प्रसंगी टँकर ने विकत पाणी आणून, दुष्काळी परिस्थिती वर मात करून बागा वाचवायच्या, त्याच शेतकऱ्यावर आज अस्मानी संकट कोसळले आहे.

हे ही वाचा...

डाळिंब बागेचा हेक्टरी खर्च हा ३,५०,००० रुपये इतका आहे. आज रोजी प्रतिकुल हवामानामुळे शेतकरी ऐन दिवाळीत हवालदिल झाला आहे. सेटिंग झालेल्या डाळिंबावर तेलकट रोग मोठ्या प्रमाणात पडला आहे. त्याचबरोबर कुजव्या रोगाने फळं आणि खोडावर मोठा परिणाम झाला आहे.

सरकारने त्वरित या बागांचा पंचनामा करून त्यांना एकरी अनुदान द्यावे आणि संकटात असणाऱ्या बळी राजाला संकटातून वाचवावे. अन्यथा हाच शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या मनस्थितीमधे असल्याचे निवेदन प्रा. लक्ष्मण हाके यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

Updated : 28 Oct 2019 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top