Home > News Update > केंद्राकडून तीन कृषी कायदे मागे.. स्वाभिमानीने साखर वाटुन आनंदोत्सव साजरा..

केंद्राकडून तीन कृषी कायदे मागे.. स्वाभिमानीने साखर वाटुन आनंदोत्सव साजरा..

केंद्राकडून तीन कृषी कायदे मागे.. स्वाभिमानीने साखर वाटुन आनंदोत्सव साजरा..
X

केंद्राकडून तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर देशभर शेतकरी संघटना आनंद व्यक्त करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

केंद्र सरकारने काही महिन्यांपुर्वी तीन कृषी कायदे संसदेत पारित केले होते.. त्या कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता.. सुमारे आठ दहा महिन्यांपासून दिल्ली,हरियाणा,पंजाब सह अनेक राज्यातील शेतकरी सीमाभागात ठाण मांडून आंदोलन करत होते.. देशभरातल्या शेतकर्यांसोबतच राज्यातीलही शेतकरी याबाबत वेळोवेळी शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आले होते.. त्याचाच परिपाक म्हणून आज या केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले.. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांच्या स्थगितीची घोषणा केली.. याचा आनंदोत्सव साजरा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांच्या नेतृत्वात विठ्ठल मंदिर परीसर पंढरपूर येथे भाविकांना व शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आली..

तीन कायद्यांना स्थगिती मिळणे हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा,संघर्षाचा,जिद्दीचा विजय आहे.. अखेर सामान्य शेतकर्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे.. आता इथुनपुढचा लढा हा दीडपट हमीभावाचा राहणार आहे.. आदरणीय राजु शेट्टीसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही एक व्यापक लढा लवकरच उभारू" असे पुढे बोलताना बागल म्हणाले..

यावेळेस जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल,जिल्हासंघटक शाहजहान शेख,सचिन आटकळे,बाहुबली सावळे,रामभाऊ वाघ,मनोज गावंधरे,नवनाथ मोहिते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते..Updated : 2021-11-19T18:23:09+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top