Home > News Update > जीएसटी उल्लंघनाची बनावट समन्स पाठवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा

जीएसटी उल्लंघनाची बनावट समन्स पाठवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा

जीएसटी उल्लंघनाची बनावट समन्स पाठवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाच्या संकेतस्थळावर विंडो वापरून करदात्यांना कोणत्याही नोटिशीची सत्यता पडताळता येणार

जीएसटी उल्लंघनाची बनावट समन्स पाठवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा
X

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाच्या (सीबीआयसी) वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) अलीकडेच असे निदर्शनास आले आहे की, काही व्यक्ती फसवणूक करण्याच्या हेतूने डीजीजीआय द्वारे तपास सुरु आहे, अथवा नाही, अशा करदात्यांना बनावट समन्स पाठवत आहेत. असे बनावट समन्स खरे वाटू शकतात, कारण त्यावर दस्तऐवज ओळख क्रमांक (डीआयएन) आहे, मात्र संबंधित डीआयएन क्रमांक हे डीजीजीआय द्वारे जारी करण्यात आलेले नाहीत.या समस्येचा सामना करण्यासाठी, असे बनावट आणि फसवे समन्स तयार करून पाठवणाऱ्या व्यक्तींविरोधात डीजीजीआय कडक पावले उचलत असून, या प्रकरणांची माहिती पोलिसांना देऊन तक्रार दाखल करत आहे.
सीबीआयसी ने 05 नोव्हेंबर 2019 रोजी जारी केलेल्या पत्रक क्र. 122/41/2019-GST द्वारे,सीबीआयसी अधिकाऱ्यांकडून करदात्यांना पाठवण्यात येणाऱ्या कागदपत्रावर डीआयएन उपयोगाबाबत माहिती दिली आहे. सतर्कतेसाठी करदात्यांना सूचित करण्यात आले आहे की, ते विभागाकडून जारी करण्यात आलेल्या कोणत्याही दस्त ऐवजाची (समन्ससह) सत्यता पडताळू शकतील. यासाठी सीबीआयसीच्या वेबसाइटवर ‘VERIFY CBIC-दिन


विंडो वापरावी अथवा डायरेक्टरेट ऑफ डेटा मॅनेजमेंट (डीडीएम), सीबीआयसीच्या ऑनलाइन पोर्टलवर डीआयएन युटिलिटी सर्च वापरावे.

वैयक्तिक करदाते ज्यांना डीजीजीआय/ सीबीआयसी द्वारे समन्स प्राप्त झाले आहे, आणि ते संशयास्पद अथवा बनावट असल्याची शक्यता वाटत आहे, त्यांनी तातडीने याबाबत डीजीजीआय/ सीबीआयसीच्या संबंधित अधिकार क्षेत्रात त्याची सत्यता पडताळून पहावी, जेणेकरून या फसवणुकीच्या प्रकारांसाठी जबाबदार असलेल्यां विरोधात आवश्यक कारवाई करता येईल.


Updated : 10 Feb 2024 11:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top