Home > News Update > फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पुन्हा व्हायरल

फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पुन्हा व्हायरल

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाकडून प्रतिकूल निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

फडणवीसांचा तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल
X

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या मागणीची सुरुवात झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जुलै 2018 मध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये आलात तर साप सोडू, अशी धमकी देण्यात आली होती.

त्यानंतर फडणवीसांनी पंढरपूरचा दौरा रद्द केला होता. मराठा आरक्षण हा संपूर्णपणे कोर्टाचा निर्णय असून सरकारी इच्छा असूनही काही करू शकत नाही असं स्पष्ट केला होतं.

माझ्यावर ( देवेंद्र फडणवीस) दगड फेकून आरक्षण मिळत असेल तर जरूर फेका असे प्रति आव्हान त्यांनी दिलं होतं. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर फडणविसांनी पुन्हा महाविकास आघाडी ला दोषी ठरवले आहे. आता सोशल मीडिया वरती हा फडणवीसांचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याने त्यांची मात्र पंचाईत झाली आहे.

Updated : 6 May 2021 4:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top