Home > News Update > मग त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय होते? काँग्रेसचा खडा सवाल

मग त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय होते? काँग्रेसचा खडा सवाल

मग त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय होते? काँग्रेसचा खडा सवाल
X

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांची सुरु झालेली आरोपांची मालिका सचिन वाझे आणि परमबीर सिंह लेटर बॉम्ब पर्यंत येऊन पोचल्यानंतर फडणवीस यांनी दाखवलेली पेनड्राईव्ह मुळ अहवालासोबत देण्यात आली नव्हती. मग फडणवीसांनी ६.३ जीबीची कोणती पेनड्राइव्ह दाखवला? केंद्रीय गृह सचिवांना जाऊन काय दिलं?," असा खडा सवाल काँग्रेस प्रवक्ते सावंत यांनी उपस्थित केला आहे फोन टॅपिंग प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

भाजपाने रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा आणि फोन टॅपिंग प्रकरणाचा हवाला देत राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांवरून काँग्रेस थेट देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेल्या पेनड्राइव्हबद्दलही काँग्रेसनं शंका उपस्थित केली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

ते म्हणाले "भाजपाने आतापर्यंत फक्त निराधार आरोप केले आहेत. ओढून ताढून या प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते वेळोवेळी तोंडघशी पडले आहेत. सगळे आरोप खोटे ठरले आहेत. त्यांना याचा सरकारशी कोणताही संबंध जोडता आला नाही हे वास्तव आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनापासून जे आरोप देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते करत आहेत. त्यात मुद्दे बदलत आहे. वारंवार ते आरोप बदलत आहेत. पहिला मुद्दा होता अँटेलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या. दुसरा आरोप होता परमबीर सिंह यांचं पत्र आणि तिसरा आरोप केला तो रश्मी शुक्ला यांनी केलेल्या अहवालाचा," असही सावंत यांनी‌ स्पष्ट केलं.

"रश्मी शुक्ला यांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं होतं. ज्याचा अहवाल त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये दिला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांनी आरोप केला. या तिन्हींचा परस्परांशी काहीही संबंध नाही. प्रत्यक्षात वेगवेगळ्या काळात झालेल्या या गोष्टी असून‌ परमबीर सिंह यांची चौकशी होऊ नये. मूळ मुद्दा दुर्लक्षित राहावा, याकरता भाजपने हे कुभांड रआहे. का? परमबीर सिंह यांना कव्हरिंग फायर देण्याचा प्रयत्न झाला का? भाजपाची हीच व्यूहरचना होती का? यांचं उत्तर काही महिन्यात मिळेल.

रश्मी शुक्लांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं होतं. त्यांनी तो अहवाल ऑगस्टमध्ये दिला होता. त्याला सात महिने होऊन गेले. तो अहवाल दिल्यानंतर अनेक अधिवेशनही झाली. मग त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय होते? काँग्रेसचा खडा सवालया सहा-सात महिन्यात भाजपाला आठवण झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला जातोय आणि ते उत्तर देत नाहीयेत. फडणवीस यांनी दाखवलेली पेनड्राईव्ह अहवालासोबत देण्यात आली नव्हती. मग फडणवीसांनी ६.३ जीबीची कोणती पेनड्राइव्ह दाखवला? केंद्रीय गृह सचिवांना जाऊन काय दिलं?," असा सवाल आता सावंत यांनी उपस्थित केला आहे

Updated : 27 March 2021 7:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top