Home > Fact Check > Fact Check | मुस्लीम तरुण कोरोना पसरवत असल्याचा दावा करणाऱ्या 'त्या' व्हिडीओचं सत्य

Fact Check | मुस्लीम तरुण कोरोना पसरवत असल्याचा दावा करणाऱ्या 'त्या' व्हिडीओचं सत्य

Fact Check | मुस्लीम तरुण कोरोना पसरवत असल्याचा दावा करणाऱ्या त्या व्हिडीओचं सत्य
X

जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. अशावेळेस भारतात निजामुद्दीन येथे तबलीक मेळाव्यामुळे पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भावाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तबलीक मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही मुस्लिम युवक भांड्यांना चाटत आहेत. हा देशभरात कोरोना पसरावण्यासाठी काही मुस्लिम कट करत असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

वेगवेगळ्या माहितीसोबत हा व्हिडीओ व्हायरल आहे.

[video width="576" height="512" mp4="http://www.maxmaharashtra.com/wp-content/uploads/2020/04/WhatsApp-Video-2020-04-02-at-18.00.03.mp4"][/video]

बिहारच्या एका मशिदीत १४ चिनी मुस्लिम लपले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासोबतच तामिळनाडूमधील मशिदीमध्ये देखील कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लपलेल्या मुस्लीमांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

राज्यातही हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. यामध्ये मुस्लीम समुदायाने कोरोना जिहाद सुरू केला असून त्यासंबधित व्हिडीओ म्हणून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

https://twitter.com/KunwarManvendrC/status/1023850585949274112?s=19

तथ्य पडताळणी :

या व्हिडीओमध्ये दिसणारे तरुण मुस्लीमच आहेत. मात्र ते बोहरा मुस्लीम आहेत. बोहरा मुस्लीम हा मुस्लिम समुदायातील एक प्रकार आहे. आपल्या विशिष्ट प्रकारच्या टोपीमुळे बोहरा मुस्लिम लगेच ओळखू येतात.

या व्हिडीओबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता हा व्हिडीओ ३१ जुलै २०१८ साली पोस्ट झालेला आढळतो. त्यानंतरही वेगवेगळ्या अकाऊंट्स आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट झालेला आहे. २०१८ पासून हा व्हिडीओ वेगवेगळ्या संदर्भाने वापरला जात आहे.

यावरून एक गोष्ट लक्षात येते की हा व्हिडीओ साधारण दीड वर्षे जूना आहे. त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. केवळ गैरसमज पसरवण्यासाठी या व्हिडीओला कोरोनाशी जोडलं गेलं आहे.

आता प्रश्न उरतो तो म्हणजे हा व्हिडीओ कुठला आहे आणि हे तरुण नेमकं काय करत आहेत.

बोहरी मुस्लिम समाजातील प्रथेप्रमाणे कुटुंबातील सर्व व्यक्ती सोबत एकाच मोठ्या थाळीत जेवण करतात. अन्नाचा एकही कण वाया जावून द्यायचा नाही अशी समाजात मान्यता आहे. थाळीतील सर्व अन्नपदार्थ संपलेच पाहिजेत असा त्यांचा आग्रह असतो. यामध्ये एकही अन्नाचा कण वाया जावू नये म्हणून तो तोंडाने चाटून स्वच्छ केला जातो. व्हायरल व्हिडीओतील तरुण हेच करत आहेत.

निष्कर्ष -

व्हायरल होत असलेला व्हिडीओ २०१८ सालचा असून त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. या व्हिडीओचा आधार घेत काही मुस्लीम कोरोना पसरवत आहेत असा केला जाणारा दावा तथ्यहीन आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. या कठीण परिस्थितीत दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे मेसेज आणि व्हिडीओ व्हायरल करू नका.

Updated : 3 April 2020 8:09 AM IST
Next Story
Share it
Top