Home > Fact Check > Fact Check | नवी मुंबईत कोंबडीला कोरोना व्हायरसची लागण?

Fact Check | नवी मुंबईत कोंबडीला कोरोना व्हायरसची लागण?

Fact Check | नवी मुंबईत कोंबडीला कोरोना व्हायरसची लागण?
X

जगभरात कोरोना वायरस ची (Corona Virus) दहशत पसरलेली असताना भारतातही या रोगाविषयी अनेक अफवा पसरताना दिसत आहे. सध्या नवी मुंबईत बॉयलर कोंबडीमध्ये कोरोना वायरस आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. बॉयलर चिकनमध्ये कोरोना वायरस सापडला असल्यामुळे कोणीही बॉयवर चिकन खाऊ नये अशी सुचना वाशी पोलिसांमार्फत दिल्याचा संदेश व्हॉट्सएपवर मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

corona-virus-fact-check

मात्र, या मेसेजमध्ये तथ्य आहे का? हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला असता हा व्हायरला व्हिडीओ आणि कोरोना व्हायरसचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुळात कोरोना विषाणू कोंबडीतून किंवा अन्य कोणत्या प्राण्याच्या संपर्कातून पसरतो आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/174178647214250/?t=2

वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव धुमाळ यांनीही सदर व्हायरल व्हिडीओ खोटा असल्याचं म्हटलं असून त्याचा कोरोना विषाणूशी काहीही संबंध नाही असं सांगितलं आहे. महापलिका अधिकाऱ्यांनीही या माहितीमध्ये तथ्य नसल्याची पुष्टी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Updated : 14 Feb 2020 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top