Home > News Update > Whatsapp,Instagram काही काळ ठप्प, युजर्सची घालमेल

Whatsapp,Instagram काही काळ ठप्प, युजर्सची घालमेल

Whatsapp,Instagram काही काळ ठप्प, युजर्सची घालमेल
X

Whatsapp,Instagram, Facebook हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शुक्रवारी रात्री काही मिनिटांसाठी ठप्प झाले होते. वॉट्सअपवरुन मेसेजेस जात नव्हते आणि येतही नव्हते त्यामुळे अनेक युजर्सना मनस्ताप सहन करावा लागला. भारतातील काही भागांसह जगभरात अनेक ठिकाणी ही समस्या उद्भवली होती. सुमारे ४५ मिनिटे या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरात ही समस्या जाणवली. रात्री साधारणत: ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. या तांत्रिक समस्येबद्दल या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण नंतर वॉट्सअपतर्फे ट्विट करुन ४५ मिनिटे सेवा ठप्प होती, पण आता सेवा पूर्ववत झाली आहे अशी माहिती देण्यात आली.

फेसबुक,वॉट्सअप, आणि इंस्टाग्राम ठप्प झाल्यानंतर लगेचच ट्विटरवर #whatsappdown, #serverdown #instagramdown आणि #facebookdown असे हॅशटॅग ट्रेण्ड झाले होते. याचबरोरबर काही नेटिझन्सनी तर मीम्सही बनवून टाकले.

Updated : 2021-03-20T09:48:31+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top