Home > News Update > Facebook, Insta News : काही वेळेत फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरू

Facebook, Insta News : काही वेळेत फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरू

Facebook, Insta News : काही वेळेत फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरू
X

Facebook news : जगभरातील समाजमाध्यमांपैकी एक फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालं होतं. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सर्व फेसबुक युजर्सचे अकाउंट लॉग आऊट झालेले पहायला मिळाले. त्यामुळे अनेक सोशल मिडीया युजर्स अस्वस्थ झालेले होते. यापूर्वीही अनेकदा अशा समस्यांना नेटकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.

या संदर्भात आता फेसबूक ने एक्स पोस्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की "आम्ही परत आलो आहोत ज्यांना Facebook मध्ये प्रवेश करता आला नाही त्यांच्यासाठी दिलगीर आहोत" अशा पद्धतीची पोस्ट फेसबुक ने एक्सवर (X) केली आहे.


तर मेटाचे सिईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg ) यांनी देखील या संदर्भात एक्स पोस्ट केली. त्यांनी म्हटले आहे की फेसबुकमध्ये येणाऱ्या आडथळ्याची " समस्या सुटली आहे आपण आता आनंद घेऊ शकता" अशा पद्धतीची पोस्ट केली आहे.

Updated : 6 March 2024 3:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top