Home > News Update > मोठी बातमी : परमबीर सिंग आणखी अडचणीत, नवीन गुन्हा दाखल

मोठी बातमी : परमबीर सिंग आणखी अडचणीत, नवीन गुन्हा दाखल

मोठी बातमी : परमबीर सिंग आणखी अडचणीत, नवीन गुन्हा दाखल
X

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त(CP) परमबीर सिंग (Parambir singh) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. परमबीर सिंग यांच्यावर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. परबमीर सिंग यांच्यासहित काही जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस (Marine Drive) ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. तर 8 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी अकबर पठाण यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बिल्डरवरील गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परबमीर सिंग अडचणीत आले आहेत.

*सचिन वाझे प्रकरणीही परमबीर सिंग अडचणीत*

सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात केवळ अनिल देशमुख यांची नाही तर सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेणाऱ्या समितीमधील सगळ्यांची चौकशी का नाही, असा सवाल हायकोर्टाने (Highcourt) सीबीआयला विचारला होता. त्यामुळे सचिन वाझेला सेवेत पुन्हा घेणाऱ्या समितीमध्ये असलेल्या परमबीर सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. केवळ इतरांवर जबाबदारी ढकलून होणार नाही, पोलीस दलाचे प्रमुख या नात्याने आपलीही जबाबदारी होती, असेही कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे आता खंडणी प्रकऱणी गुन्हा दाखल झाल्याने परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Updated : 22 July 2021 7:35 AM GMT
Next Story
Share it
Top