Home > News Update > मुंबईनंतर अमरावती जिल्ह्यात जिलेटीनसह स्फोटकं सापडली

मुंबईनंतर अमरावती जिल्ह्यात जिलेटीनसह स्फोटकं सापडली

मुंबईनंतर अमरावती जिल्ह्यात जिलेटीनसह स्फोटकं सापडली
X

सध्य़ा राज्यासह देशभरात मुंबईतील जिलेटीन प्रकरण गाजत आहे. मुंबईमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीत जिलेटीन आढळल्यानंतर सर्ववत्र खळबळ उडाली. यातूनच मग सचिन वाझे प्रकरण सुरू झाले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटे ३ वाजता अमरावती जिल्ह्यातही अशीच स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकात जिलेटीनसह स्फोटके आढळली आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली होती.

त्यानुसार २ युवक मोटरसायकलने जिलेटीन व स्फोटके घेऊन जाताना सापडले. जे गाडीवरुन जात असताना संशय आल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी त्यांच्याकडून २०० नग जिलेटीन कांड्या व २०० नग नॉक डिटोनेर आढळून जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि तिवसा पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी केली असता यामध्ये २ नावे समोर आली आहेत. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Updated : 19 March 2021 12:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top