Home > News Update > ''शब्द पाळला नाही तर बिऱ्हाड फडणवीसांच्या घरावर..'' राजू शेट्टींचा इशारा

''शब्द पाळला नाही तर बिऱ्हाड फडणवीसांच्या घरावर..'' राजू शेट्टींचा इशारा

शब्द पाळला नाही तर बिऱ्हाड फडणवीसांच्या घरावर.. राजू शेट्टींचा इशारा
X

नाशिक जिल्हा बँकेच्या विरोधात आज मालेगाव येथील मंत्री दादा भुसे यांच्या घरावर शेतकऱ्यांच बिऱ्हाड आंदोलन हे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. काळ सकाळी मालेगावात शेतकरी ठान मांडून बसले होते. त्यानंतर सहकार मंत्री संजय सावे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातले साधारण 65 हजार शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक जिल्ह्यात याविरुद्ध मोठा आक्रोश आहे. राज्य सरकारनं नाशिक जिल्हा बँकेला राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस करण्याचा आदेश द्यावा व त्यासाठी योग्य तो हस्तक्षेप करावा, 62 हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या मार्फत हे बिऱ्हाड आंदोलन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

मूळ कर्जावर केवळ सहा ते आठ टक्के सरळ व्याजाची आकारणी करण्यात येईल, शेतकऱ्यांकडून सुरू असलेली वसुली थांबवण्यात येईल, बँकांच्या नावाखाली ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव झाला आहे त्यांना 157 खाली स्थगिती देण्यात येईल असे महत्त्वपूर्ण निर्णय झाल्यानंतर अखेर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आले. याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः मोबाईल द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत जबाबदारी स्वीकारली आहे.

जर दिलेला शब्द पाळला न गेल्यास येणाऱ्या 16 फेब्रुवारीला थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे. सहकार मंत्री संजय सावे आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अखेर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं हे आंदोलन सायंकाळी उशिरा स्थगित करण्यात आलं.

Updated : 17 Jan 2023 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top