Home > News Update > बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी; जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव

बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी; जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव

बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी; जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
X

राज्यातील सत्ता परिवर्तनात महत्त्वाची भूमिका असलेले शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिंदे फडणवीस सरकारचा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांच्यावर बंदूक चालवण्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कृषिमंत्री सत्तार शेख यांना देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे आणि फडणवीस यांनी समज दिली आहे. समर्थक आमदारांमध्ये खदखद असताना आगामी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत अजून स्पष्टता नाही. त्यातच न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे बच्चू कडू अडचणीत आले आहे.

राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली असून बच्चू कडूंना आता तुरुगांत जावे लागणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केल्याची माहिती आहे.

बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे ते स्वत: आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या निषेधाच्या गुन्ह्यात गिरगाव न्यायालयात हजर होते. मात्र, न्यायालयाने आज त्यांचा जामीन फेटाळला असून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे, शिंदे गटातील प्रमुख आमदार तुरुंगात जाणार हे स्पष्ट झाले आहे.

या निर्णयावर त्यांनी तात्काळ सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयानंतरच आमदार बच्चू कडू तुरुंगात जाणार की नाही, याचा निकाल लागेल.

Updated : 14 Sep 2022 8:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top