Home > News Update > विधानसभेत उलट टांगेन तुम्हाला; पोलिसांना धमकी देतानाची भाजप नेत्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

विधानसभेत उलट टांगेन तुम्हाला; पोलिसांना धमकी देतानाची भाजप नेत्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

विधानसभेत उलट टांगेन तुम्हाला; पोलिसांना धमकी देतानाची भाजप नेत्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
X

जिल्ह्यातील व्यापाऱ्याच्या घरावर बेकायदेशीर धाड टाकणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करतानाची भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.यात त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला विधानसभेत उलटं टांगण्याची थेट धमकीच दिली आहे.

तीन दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी हसन गोहर यांना परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच हसन गोहर यांनी पथकासह त्या व्यापाऱ्यांच्या घरात धाड टाकली. मात्र त्या ठिकाणी काहीच आढळून आलं नाही.त्यांनतर या व्यापाऱ्याने झालेला प्रकार लोणीकर यांच्या कानावर घातला.

व्यापाऱ्यांची कैफियत ऐकल्यानंतर लोणीकर यांनी परतूरचे एपीआय रवींद्र ठाकरे यांना फोन करून झाप-झाप झापले. तर याचवेळी त्यांनी पोलिसांना विधानसभेत उलटं टांगून मारू, अशी धमकी सुद्धा दिली. आमचे 105 आमदार आहेत, विधानसभेत मुद्दा उपस्थित केले तर गोहर यांची नोकरी जाईल असेही लोणीकर म्हणाले.लोणीकरांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.मात्र या ऑडिओ क्लिपसंदर्भात अद्यापही खातरजमा झालेली नाही.


Updated : 29 Nov 2020 3:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top