Home > Max Political > साताऱ्यात EVM यंत्रात फेरफार! घड्याळाचं मत कमळाला...

साताऱ्यात EVM यंत्रात फेरफार! घड्याळाचं मत कमळाला...

साताऱ्यात EVM यंत्रात फेरफार! घड्याळाचं मत कमळाला...
X

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदान केंद्रात संतप्त मतदारांनी गोंधळ घातल्यानंतर EVM मशीन बदलण्यात आली आणि पुढे मतदान पार पडलं.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात नवले गावामध्ये हा प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रात मतदार कमळासमोरचं बटण दाबल्यानंतरही भाजपला मत जात असल्याची तक्रार नागरिक करत होते. तरीही मतदान कक्षातील निवडणूक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र अन्य मतदारांनाही असाच अनुभव आल्यानंतर मतदारांचा संताप वाढला आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं.

पोलिसांनी स्थिती हाताळत निवडणूक अधिकारी आणि ग्रामस्थांसोबत मशीनची तपासणी केली असता घडला प्रकार खरा असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आली आणि पुढील मतदान पार पडलं. तोपर्यंत मतदानाचे चार तास लोटुन गेले होते आणि २९० मतदारांनी मतदान केल्याचं गावकरी सांगत आहेत.

संबधित प्रकाराबद्दल मतदारांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची शहानिशा करताना घडाळ्याला मतदान केल्यावर कमळाला जात असल्याचं मतदान केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यांनीही मान्य केलं आहे. मात्र, या गंभीर घटनेबाबत आता निवडणूक आयोगाकडून काय कार्यवाही करणार याबाबत अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही.

निवडणूकीच्या पुर्वीपासुनच विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवला होता. साताऱ्याचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी भाजप प्रवेश करण्यापुर्वी मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करुन भाजप EVM यंत्रात फेरफार करत असल्याचा आरोपही केला होता. आता राजकीय वर्तुळात या घटनेचे काय पडसाद हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Updated : 22 Oct 2019 9:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top