Home > News Update > कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्स; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्स; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्स; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
X

देशातील कोरोना आढाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या महत्वपूर्ण व्हिडीओ कॉन्फसरन्समधे 'कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाल यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे', अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रानेही राजस्थान, गोवा, दिल्लीमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती दिली आहे.

'कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाल यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे', अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूटची लस डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा सिरमच्या अदर पुनावाला यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. 100 देशांच्या राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 100 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यात दाखल होतील. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे.

तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहे. पंतप्रधान मोदी हे 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूट निर्माण करत असलेल्या कोरोना लसीचा आढावा घेणार आहेत.

Updated : 24 Nov 2020 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top