Home > News Update > Kirit Somaiyya आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात महिला आयोगाची एंट्री

Kirit Somaiyya आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात महिला आयोगाची एंट्री

Kirit Somaiyya आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात महिला आयोगाची एंट्री
X

मुंबई – भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओनंतर देशभरात खळबळ माजलीय. व्हायरल झालेल्या या व्हिडिओचे पडसाद आज विधीमंडळातही उमटले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधीमंडळातील सदस्यांनी केलीय. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आता याच प्रकरणात राज्य महिला आयोगाची एंट्री झालीय.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेशच मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत. विविध सामाजिक संस्थांकडून या व्हिडिओ विषयी आयोगाला विचारणा करण्यात येत आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास तात्काळ सादर करण्यासंदर्भातले निर्देश आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.






Updated : 18 July 2023 5:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top