Home > News Update > पाकिस्तानची जगात नाचक्की ; इंग्लंडने आपला पाकिस्तान दौरा केला रद्द

पाकिस्तानची जगात नाचक्की ; इंग्लंडने आपला पाकिस्तान दौरा केला रद्द

पाकिस्तानची जगात नाचक्की ; इंग्लंडने आपला पाकिस्तान दौरा केला रद्द
X

न्यूझीलंड पाठोपाठ आता इंग्लंडने देखील आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडने हा दौरा रद्द केल्याचे ट्वीट इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची जगात चांगलीच नाचक्की झाली आहे. इंग्लंड पुरूष आणि महिला संघ पाकिस्तानचा दौरा करणार होते. तब्बल १६ वर्षानंतर इंग्लंडचा पाकिस्तान दौरा करणार होता. मात्र , पाकिस्तान दहशतवादा पाठींबा देणारा देश असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडने दौरा रद्द केला आहे.

"इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द करण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा ऑक्टोबरमध्ये होणारा पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आला आहे.", असं ट्वीट इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केले आहे.

मार्च २००९ मध्ये श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.लाहोरच्या स्टेडियमबाहेर हा हल्ला करण्यात आला होता, ज्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान मालिका खेळण्यासाठी येत होता. मात्र हल्ल्याची माहिती मिळताच ते मायदेशी परतलो होते, आता इंग्लंडने देखील आपला दौरा रद्द केल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.

Updated : 2021-09-21T06:13:13+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top