आता मिळवा ऑनलाईन रोजगार, कुठं आणि कसा जाणून घ्या…

लातूर:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर यांच्या मार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा 4 जूलै 2020 पर्यंत सुरु राहणार आहे.नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्धतेसाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने मेळावा महत्वाचा आहे.

मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच मोबाईल किंवा दूरध्वनीव्दारे घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शासनाने जाहिर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते.आता शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. आस्थापनांना मनुष्यबळाची आणि बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता आहे.

इच्छुकांसाठी या जागा रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांतील 130 रिक्तपदे उपलब्ध् असून (सदरच्या पदसंख्येमध्ये वाढ होवू शकते ) या कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी ऑनलाइन पध्दतीने तसेच मोबाईल, दूरध्वनीव्दारे पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पदांसाठी रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

ऑनलाइन ॲप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसेल तर www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन online job fair Latur-1 यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध् रिक्त पदांसाठी ॲप्लाय करावे, असे आवाहन प्र. सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here