News Update
Home > News Update > ElonMuskचा सोशल मिडीया दंगा सरुच : आता CocoCola विकत घेण्याची केली घोषणा

ElonMuskचा सोशल मिडीया दंगा सरुच : आता CocoCola विकत घेण्याची केली घोषणा

टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांची सोशल मिडीयावरुन घोषणा सुरु असून ट्विटरच्या खरेदीनंतर त्यांनी आता CocoCola विकत घेण्याची केली घोषणा केलीय. फेक फॉलोवर आणि बॉट्सवर कठोर कारवाईची करणार असल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे.

ElonMuskचा सोशल मिडीया दंगा सरुच : आता CocoCola विकत घेण्याची केली घोषणा
X

टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांची सोशल मिडीयावरुन घोषणा सुरु असून ट्विटरच्या खरेदीनंतर त्यांनी आता CocoCola विकत घेण्याची केली घोषणा केलीय. फेक फॉलोवर आणि बॉट्सवर कठोर कारवाईची करणार असल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे.

टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर कंपनीचा संपूर्ण मालकी हक्क विकत घेतला. १०० टक्के मालकी हक्क विकत घेण्यासाठी मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे कंपनीला ऑफर दिलेली. कंपनीने ही ऑफर स्वीकारली असून ४४ अब्ज डॉलरमध्ये मस्क हे ट्विटरचे नवे मालक झाले आहेत.

मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर आता पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता लागून राहिलेली असतानाच मस्क यांनी केलेल्या एका ट्विटमुळे ते पुन्हा चर्चेत आले. त्यांनी आत थेट जगप्रसिद्ध अशा कोका-कोला या कंपनीला विकत घेणार असल्याची घोषणा केलीय.

"मी कोका-कोला कंपनी विकत घेणार आहे," असं त्यांनी ट्विट करुन म्हटलंय. हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं असून कोका-कोला कंपनी ट्विटवर टॉप ट्रेण्डमध्ये आलीय.काही आठवड्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनतर ते ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले होते. मात्र त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. कंपनी खासगी असेल तर त्यात बदल घडवता येतात असंही यावेळी ते म्हणाले होते. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी दिलेल्या प्रस्तावानंतर ट्विटरच्या समभागाने ९ टक्क्यांची उसळी घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मस्क यांनी ट्विटर विकत घेतलं होतं. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना मुक्तपणे संवाद करण्याचं हे माध्यम अधिक युझर फ्रेण्डली आणि ओपन सोर्स माध्यम झालं पाहिजे असं मस्क म्हणाले होते.

याच खासगी कंपनी असल्यावर बदल करतात येतात या धोरणानुसार आत मस्क यांनी कोका-कोलासंदर्भात ट्विट केलंय. खरं म्हणजे मस्क यांनी हे ट्विट एक विनोद म्हणून पोस्ट केलं आहे. कोका-कोला बनवण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म्युला आपल्याला जाणून घ्यायाचाय असा यामागील अर्थ असल्याचं सांगितलं जातंय. कोकेनचा वापर कोका-कोला बनवताना केला जात असल्याने हा नेमका फॉर्म्युला काय आहे हे जाणून घेण्यासाठी मस्क अटलांटामधील ही कंपनीच विकत घ्यायला निघालाय. "मी कोका-कोला कंपनी विकत घेणार आहे, त्यात पुन्हा कोकेन टाकण्यासाठी" असं मस्क यांचं संपूर्ण ट्विट आहे.

डेव रुबीन या ट्विटर वापरकर्त्यांनं न्युयॉर्क टाईम्स आणि फोर्ब्स कंपन्यांचे असंख्य फेक फोलॉवर आणि बॉट असल्याचे म्हटले होते.

त्याला उत्तर देताना ElonMusk हे माझ्या लक्षात आलं असून हे विचित्र आहे. यावर लवकरच कारवाई करावी लागेल असं म्हटलं आहे.

या ट्विटनंतर मस्क यांनी मॅकडॉनल्ड्स हा प्रसिद्ध फास्टफूड ब्रॅण्ड विकत घेण्यासंदर्भातील एक स्क्रीनशॉर्ट पोस्ट केलाय. यामागील कारण देताना त्यांनी मॅक्-डीमधील सर्व आइस्क्रीम मशीन ठीक करायच्या आहेत असं म्हटलंय. मात्र आपल्या या जुन्या ट्विटवर आता प्रतिक्रिया देताना, "मी चमत्कार करु शकत नाही," असा उपहासात्मक टोला त्यांनी लागवलाय.

दरम्यान, ट्विटर विकत घेतल्यानंतर मुक्तपणे बोलणं, व्यक्त होणं हा लोकशाहीचा कणा आहे. ट्विटर हे असं डिजीटल माध्यम आहे ज्यावर भविष्यात मानवी जीवनावर परिणाम करु शकणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा होतात, असं मस्क यांनी म्हटलेलं. तसेच, "मला ट्विटरमध्ये आणखी नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमावरील विश्वास वाढवण्यासाठी हे एक ओपन सोर्स अल्गोरिदम असणारं माध्यम करायचं आहे, स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचं ऑथेंटिकेशन अशी बरीच काम डोक्यात आहेत. ट्विटरमध्ये फार क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच या माध्यमावर असणाऱ्यांसाठी नवीन दारं उघडली जाणार आहेत," असं म्हणत मस्क यांनी भविष्यातील बदलांचे संकेत दिलेत.

सोशलमिडीयातील इलॉन मस्कच्या धुमाकुळामुळे अनेक संदर्भ बदलत असून ट्विटरचे मुख्यकार्यकारी अधिकारी पराग अगरवाल देखील चिंतेत असल्याचे दिसत आहे.


I took this job to change Twitter for the better, course correct where we need to, and strengthen the service. Proud of our people who continue to do the work with focus and urgency despite the noise.

Twitter अधिक चांगल्यासाठी बदलण्यासाठी मी हे काम स्वीकारले आहे, जिथे आवश्यक आहे तिथे योग्य आहे आणि सेवा मजबूत केली आहे. आमच्या लोकांचा अभिमान आहे जे आवाज असूनही लक्ष केंद्रित करून आणि तत्परतेने काम करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

Updated : 28 April 2022 5:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top