Home > News Update > एलॉन मस्कचे ५३ % टक्के फॉलोवर्स बनावट,स्पार्कटोरोच्या ऑनलाईन रिसर्च अहवालात दावा

एलॉन मस्कचे ५३ % टक्के फॉलोवर्स बनावट,स्पार्कटोरोच्या ऑनलाईन रिसर्च अहवालात दावा

एलॉन मस्कचे ५३ % टक्के फॉलोवर्स बनावट,स्पार्कटोरोच्या ऑनलाईन रिसर्च अहवालात दावा
X

जगातील आघाडीचे अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे.स्पार्कटोरोच्या ऑनलाईन रिसर्च अहवालात असं म्हटलं आहे की एलॉन मस्क यांचे अर्ध्याहून अधिक ट्विटर फॉलोवर्स बनावट आहेत.

एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी ४४ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत.सध्या टेस्ला सीईओ एलॉन मस्क यांचे ट्विटरवर ९० मिलियन फॉलोवर्स आहेत.स्पार्कटोरोवर ऑडिट केलेल्या परिणामांमधून असे दिसून आले आहे की, मस्क यांचे ५३.३ टक्के फॉलोअर्स बनावट आहेत, याचा अर्थ त्यांच्या फॉलोवर्स लिस्टमध्ये बनावट किंवा असक्रिय खाती आहेत.

स्पार्कटोरोने सांगितले की, ऑडिटने एलॉन मस्क यांना फॉलो करणाऱ्या नवीननतम एक लाख खात्यांमधून २००० खात्यांचे विश्लेषण केले.त्यानंतर स्पॅम बॉट कमी दर्जाच्या खात्यांशी संबंधित २५ पेक्षा अधिक घटक तपासले गेले.यावरुन स्पार्कटोरोने आपल्या अहवालात म्हटले आहे.एलॉन मस्क यांना फॉलो करणाऱ्या फॉलोवर्सपैकी सरासरी ४१% फॉलोवर्स बनावट आहेत.

एलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यापूर्वी सांगितले होते की त्यांनी स्पॅम आणि बनावट खाती बंद करण्यास सांगितले होते. मास्क यांनी २१ एप्रिल रोजी ट्विट केले, जर आम्ही ट्विटर खरेदी केले, तर आम्ही स्पॅमबॉट्स काढून टाकण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करू. फोर्ब्सच्या मते, मस्कची एकूण संपत्ती २६८ अब्ज डॉलर आहे.

Updated : 5 May 2022 10:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top