Home > News Update > Elon Musk : बापरे ! ट्वीटरचे 75 टक्के कर्मचारी होणार बेरोजगार?

Elon Musk : बापरे ! ट्वीटरचे 75 टक्के कर्मचारी होणार बेरोजगार?

एलॉन मस्क यांनी ट्वीटर डील अखेरच्या टप्प्यात असताना रद्द केली होती. मात्र त्यानंतर एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा ट्वीटरच्या खरेदीत रस दाखवला आहे. त्यापार्श्वभुमीवर 75 टक्के कर्मचारी बेरोजगार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Elon Musk : बापरे ! ट्वीटरचे 75 टक्के कर्मचारी होणार बेरोजगार?
X

Elon Musk Twitter Deal : जगातील श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क यांनी ट्वीटर डील अखेरच्या टप्प्यात असताना अचानक रद्द केली. मात्र पुन्हा एकदा मस्क यांनी ट्वीटर डीलमध्ये रस दाखवला आहे. दरम्यान मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर ते ट्वीटरच्या 75 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याची माहिती एका रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे ट्वीटरचे 75 टक्के कर्मचारी बेरोजगार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर ट्वीटरने कंपनीच्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याची कोणतीही योजना नसल्याचे म्हटले आहे.

एलॉन मस्क हे गेल्या अनेक दिवसांपासून ट्वीटर डीलमुळे चर्चेत आहेत. मात्र ट्वीटरचे अनेक वापरकर्ते बनावट असल्याचे सांगत एलॉन मस्क यांनी ही डील रद्द केली होती. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा एलॉन मस्क यांनी आपण ट्वीटर डीलसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार मस्क हे 54.20 डॉलर प्रति शएअर किंमतीने 44 अब्ज डॉलरमध्ये ट्वीटर खरेदी करणार आहेत. मात्र सध्या ट्वीटर आणि एलॉन मस्क यांच्यात कायदेशीर लढाई सुरु आहे.

दरम्यान या कायदेशीर लढाईतून मुक्त होण्यासाठी एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा ट्वीटर डीलबाबत नवे पत्र पाठवले आहे. त्यापार्श्वभुमीवर मीडिया रिपोर्टमध्ये 75 टक्के ट्वीटर कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार असल्याची बातमी समोर आल्याने अनेकांची धास्ती वाढली होती. मात्र ट्वीटरच्या खरेदीनंतर मस्क नेमका काय निर्णय घेणार? यावर कंपनीतील कर्मचाऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे.

Updated : 21 Oct 2022 9:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top