Home > News Update > एलॉन मस्कची ट्वीटर खरेदीसाठी अब्जावधींची ऑफर

एलॉन मस्कची ट्वीटर खरेदीसाठी अब्जावधींची ऑफर

Tesla कंपनीचे CEO एलॉन मस्क (Elon musk) यांचे ट्वीट सध्या चर्चेत आहेत. Twitterचे संचालकपद मस्क यांनी नाकारले होते, त्याचे कारण आता समोर आले आहे.

एलॉन मस्कची ट्वीटर खरेदीसाठी अब्जावधींची ऑफर
X

एलॉन मस्क यांनी ट्वीटरच्या ब्ल्यू टिक साठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता वर्तवली होती. तर त्यानंतर त्यांनी ट्वीटरच्या संचालक मंडळात सहभागी होण्याबाबत ट्वीट केले होते. मात्र आता एलॉन मस्क यांनी थेट ट्वीटर खरेदीसाठी विक्रमी किंमतीची ऑफर दिली आहे.

एलॉन मस्क गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरबाबत केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आहेत. त्यातच आता एलॉन मस्कने ट्वीटरच्या सध्याच्या शेअर बाजारातील किंमतीपेक्षा 54.20 डॉलर/शेअर इतक्या विक्रमी किंमतीत ट्वीटर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. (Elon Musk offer to Twitter)



एलॉन मस्कने ट्वीट करून दिलेल्या ऑफरची माहिती दिली. त्यामध्ये एलॉन मस्कने ट्वीटरमधील 12 टक्के समभाग वाढवण्यासाठी ट्वीटरला 43 अब्ज डॉलरची ऑफर दिली आहे. त्यामुळे तर ही ऑफर 1 एप्रिल 2022 च्या शेअर बाजारातील दरापेक्षा 38 टक्के अधिक आहे. मस्कच्या ऑफरनंतर प्रि-ट्रेडिंगमध्ये ट्वीटरच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची वाढ होईल. (Elon Musk's Twitter Bid)



एलॉन मस्कने ट्वीट करून म्हटले आहे की, मी ट्वीटर खरेदीसाठी ऑफर देत आहे. तसेच त्यांनी ट्वीटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना पत्र लिहून म्हटले आहे की, मी गुंतवणूक केल्यापासून आतापर्यंत केलेल्या विश्लेषणानुसार कंपनी ही सामाजिक गरज पुर्ण करू शकत नाही. त्यामुळे कंपनीचे खासगीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी दिलेली ऑफर ही सर्वोत्कृष्ट आणि अंतिम ऑफर आहे. त्यामुळे माझी ऑफर स्वीकारली नाही तर मला भागधारक म्हणून विचार करावा लागेल. त्यामुळे ट्वीटर एलॉन मस्क यांची ऑफर स्वीकारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Elon musk offer for Twitter)

याआधी काय घडले होते?

एलॉन मस्क हे ट्वीटर या कंपनीचे भागधारक आहेत. त्यांनी यापुर्वी ट्वीट करून म्हटले होते की, ब्लू टीकसाठी लोकांना 3.5 डॉलर प्रति महिना पैसे मोजावे लागू शकतात. तर त्यानंतर एलॉन मस्क यांनी पुन्हा एक ट्वीट करत जगातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींकडून अत्यंत कमी ट्वीट केले जात असल्याचे म्हटले होते. (Popular person twitter use)



एलॉन मस्क ट्वीटरच्या संचालक मंडळात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र एलॉन मस्क यांनी संचालक मंडळात सहभागी होण्याची शक्यता फेटाळून लावली. तसेच याबाबत ट्वीटरचे सीईओ (Twitter CEO) पराग अग्रवाल यांनी माहिती दिली. पराग अग्रवाल (Parag Agrawal) म्हणाले, मी यापुर्वीही एलॉन मस्क यांच्याशी संचालक मंडळात सहभागी होण्याविषयी बोललो होतो. त्यांना कंपनीची उपकंपनी म्हणून काम करण्यासाठी संचालक मंडळाची ऑफर दिली होती. मात्र एलॉन मस्कने नकार दिला.


Updated : 6 Sep 2022 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top