Home > News Update > twitter blue tick : ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी 'या' तारखेपासून मोजावे लागणार पैसे

twitter blue tick : ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी 'या' तारखेपासून मोजावे लागणार पैसे

ट्विटर खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यातच ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे म्हटले होते. अखेर त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

twitter blue tick : ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी या तारखेपासून मोजावे लागणार पैसे
X

ट्विटर खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यातच ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे म्हटले होते. अखेर त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ट्विटरमध्ये बदल करण्यात आले. ट्विटरच्या सीईओसह अनेक महत्वाच्या पदावरील व्यक्तींना काढून टाकण्यात आले. त्याबरोबरच ट्विटरमधील कर्मचारी कपात करण्यात आली. त्यामुळे एलन मस्क हे चर्चेत आहेत. मात्र आता एलन मस्क यांनी ट्विट करून भारतात ब्ल्यू टिकसाठी 20 तारखेपासून पैसे मोजावे लागतील, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ब्ल्यू टिक असलेल्यांनी 20 तारखेपर्यंत आपली ब्ल्यू टिक टिकवण्यासाठी पैसे मोजले नाहीत तर तुमच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक ट्विटर काढून टाकणार आहे.

we’re relaunching @TwitterBlue on Monday – subscribe on web for $8/month or on iOS for $11/month to get access to subscriber-only features, including the blue checkmark 🧵 pic.twitter.com/DvvsLoSO50

— Twitter (@Twitter) December 10, 2022

ब्ल्यू टिकसाठी किती पैसे मोजावे लागणार?

ट्विटरने जारी केलेल्या माहितीनुसार आपण कोणता फोन वापरतो. त्यानुसार पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामध्ये अँड्रॉईड फोनमध्ये ट्विटर वापरणाऱ्यांना 11 डॉलर प्रतिमाह तसेच 114.99 डॉलर प्रतिवर्ष मोजावे लागणार आहेत. त्याबरोबरच तुम्ही वेबसाईटवर 8 $ प्रतिमाह तर IOS साठी ११ डॉलर प्रति महिना मोजावे लागणार आहेत.


Updated : 13 April 2023 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top