Home > News Update > एल्गार प्रकरण: प्रकाश आंबेडकरांकडून शरद पवारांची कोंडी

एल्गार प्रकरण: प्रकाश आंबेडकरांकडून शरद पवारांची कोंडी

एल्गार प्रकरण: प्रकाश आंबेडकरांकडून शरद पवारांची कोंडी
X

एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी आता केंद्र सरकार करत आहे. मात्र, केंद्राकडे हे प्रकरण चौकशी साठी जाण्यापुर्वी शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे प्रकरण बनावट असल्याचं म्हटलं होतं. हाच धागा पकडत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे. हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल. त्यामुळे शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी बोगस कागदपत्रे सार्वजनिक करावीत, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत Adv. प्रकाश आंबेडकर म्हणाले, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी केले होते. दरम्यान केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले.

एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे याठिकाणी लावण्यात आले. हे सुरू असतानाच, राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे.

त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे. याची माहिती लोकांना होईल. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Updated : 15 Sep 2020 12:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top